Khodala

धक्कादायक ! सर्पदंशामुळे 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

848 0

जव्हार : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील (Sayde Gram Panchayat) बोरीची वाडी (Borichi Wadi) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सात वर्षांच्या चिमुकलीला सर्पदंशामुळे (Snake bite) आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असा आरोप या मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
छाया सखाराम भोई (वय 7) (Chhaya Sakharam Bhoi) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती मंगळवारी संध्याकाळी अंगणात खेळत होती. खेळत असतानाच तिला सर्पदंश झाला. ही घटना तिच्या वडिलांना कळतात त्यांनी तिला तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Khodala Primary Health Centre) दाखल केले. तासाभराच्या कालावधीनंतर तेथील डॉक्टरांनी तिला सर्पदंश झालेला नाही, तर खेळत असताना दुखापत झाल्याचे सांगितले. यानंतर तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले.

यानंतर तिच्या वडिलांनी तिला घरी नेले. त्यानंतर काही वेळाने तिची तब्येत खालावल्याने तिला पुन्हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टरने सांगितले की तिला तत्काळ मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करा, इथे तिच्यावर उपचार होणार नाहीत. यादरम्यान मोखाड्याकडे नेत असताना अर्ध्या वाटेत या चिमुकलीचा मृत्यू झाला. यानंतर माझ्या मुलीच्या मृत्यूला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरच जबाबदार आहेत, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…

महत्वाची बातमी : बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार

Posted by - March 25, 2023 0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात असून दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे. बारावीचा निकाल…

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन

Posted by - October 18, 2022 0
पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली…
Amrawati News

Amravati News : झाडाचा आश्रय घेणे पडले महागात; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू

Posted by - July 20, 2023 0
अमरावती : सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यादरम्यान अमरावती (Amravati News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *