Navi Mumbai

Navi Mumbai : बाबांसोबत गार्डनमध्ये खेळायला गेली अन् गमावला जीव

10169 0

नवी मुंबई : नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिकेतील उद्यानातील बेंच अंगावर पडून (Navi Mumbai) एका 4 वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. खारघर सेक्टर-12 येथील उद्यानात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पनवेल पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
गिरीराज सोसायटी प्लॉट नंबर 36 येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असलेल्या प्रकाश विश्वकर्मा यांची मुलगी ब्रीजा ही आपल्या वडिलांसोबत खारघर येथील उद्यानात खेळायला गेली होती.ब्रीजा खेळत असताना तिचे वडील एका बेंचवर बसले होते. खेळता खेळता ब्रीजाला दम लागल्याने ती तिथेच एका बेंचवर बसण्याकरता गेली. परंतु बेंच नादुरुस्त आणि बिघडलेला असल्याने तोच बेंच ब्रीजाच्या अंगावर पडला.

यानंतर मुलीच्या अंगावर बेंच पडलेला पाहून ब्रीजाच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ आपल्या मुलीच्या दिशेने धाव घेतली. यानंतर त्यांनी वडिलांनी कसेबसे ताकतीने बेंच उचलून बाजूला केला. परंतु, अंगावर पडलेल्या बेंचच्या भारी वजनामुळे ब्रीजाचा जागीच मृत्यू झाला. आपल्या 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

sharad pawar

Sharad Pawar : शरद पवार यांचे बंडखोरांवर थेट कारवाईचे संकेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

चांगले काम करा ; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत – अजित पवार

Posted by - April 20, 2022 0
कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा…

सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीची कारवाई; पुणे, पिंपरी येथे छापे

Posted by - April 5, 2023 0
सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीने कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी आणि…
Breaking News

Air Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार: राज्य सरकारचा मोठा निर्णय

Posted by - July 12, 2023 0
मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण पाहून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स…
Cattle Smugglers

Cattle Smugglers : गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर गंभीर हल्ला; 1 जणाचा मृत्यू

Posted by - June 20, 2023 0
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील अप्पारावपेठ इथं एक धक्कादायक घटना घडली आहे .गोवंश तस्कारांनी (Cattle Smugglers) गोरक्षकांवर शस्त्रांनी गंभीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *