Satara News

Satara News : सातारा हादरला ! साताऱ्यात खून करून रस्त्यातच जाळला तरुणाचा मृतदेह

20610 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वनवासमाची (ता. कराड) गावाच्या हद्दीत एका 30 वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला आहे. सहापदरी कामाच्या सिमेंट नाल्यात हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचा 10 तासांपूर्वी खून करून मृतदेह गोणपाटात गुंडाळून जाळण्यात आला, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मृतदेह जळून खाक झाल्याने ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. तर काही तांत्रिक बाबींवर तपासाला गती देऊन मारेकऱ्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, वनवासमाची (ता. कराड) हद्दीत स्वराज इन्स्टिट्यूट, कॉलेजसमोर सुरू असलेल्या सेवा रस्ता व महामार्गाच्या मधोमध तयार केलेल्या सिमेंटच्या नाल्यातून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी वनवासमाची गावच्या पोलीस पाटलांना याची कल्पना देण्यात आली. त्यांनी तळबीड पोलिसांना प्राथमिक माहिती दिली. माहिती मिळताच तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात कशाचा तरी धूर येत आहे, हे पाहण्यासाठी पोलीस काही अंतर आत गेले असता अंदाजे 30 वर्षीय युवकाचा मृतदेह गोणपाटात बांधून जाळलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता घटनास्थळी एक चप्पल सुस्थितीत, तर एक आर्धी जळालेल्या अवस्थेत मिळून आली आहे. यासह दारूची बाटली, घड्याळ व अन्य महत्त्वाच्या काही वस्तू मिळून आल्या. सातारा येथील ठसेतज्ञ, श्वान पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान जवळच असलेल्या स्वराज इन्स्टिट्यूट कॉलेजच्या पाठीमागे जाऊन घुटमळले. पोलिसांनी हा मृतदेह परराज्य (कर्नाटक) येथील असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी केलेला पंचनामा व काही तांत्रिक बाबींवर निकष काढत पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. लवकरच संशयितांना ताब्यात घेऊ, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Related Post

Gadchiroli News

Gadchiroli News : पोलिसांची मोठी कारवाई ! 8 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा

Posted by - December 14, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिसांनी (Gadchiroli News) मोठी कारवाई केली आहे. यामध्ये त्यांनी माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला आहे. त्यांनी या…

Weather Department : कोकण, मध्य महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Posted by - August 7, 2022 0
महाराष्ट्र : काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पडायला सुरुवात केली आहे. राज्यातील काही भागात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने…

रावणाचा जीव बेंबीत तर काहींचा मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Posted by - March 25, 2022 0
मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक…
Crime

पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडांची दहशत;गावगुंडांच्या टोळक्याचा वाईन शॉप चालकावर हल्ला

Posted by - February 4, 2024 0
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली असून, स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार…
Sushma Andhare

Maratha Reservation : “भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *