Pune

पुण्यात तीन कोटी 42 लाखाची रोख रक्कम जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

770 0

पुणे : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने जप्त केली आहे. सोमवारी (ता. 8 मे) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला याबाबत ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरून (Pune Solapur Highway) एक चार चाकी जात असताना संशय आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने थांबवली. त्यानंतर या वाहनाची झडती घेण्यात आली. यामध्ये चार चाकीमध्ये काही बॅगेत तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि चारचाकी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणत याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) नोंद केली आहे.

Money

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सह आसपासच्या राज्यातील पोलीस सतर्क आहेत. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रशांत गांधीकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम आपल्याला कर्जापोटी भरायची आहे, असे त्याने सांगितले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Punit Balan

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Posted by - February 15, 2024 0
पुणे : खडकी येथील गुरूद्वारा श्री गुरु सिंह सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन (Punit Balan) ग्रुपचे अध्यक्ष व युवा…

Breaking News ! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्या इयत्ता १० वीचा निकाल जाहीर होणार

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- परीक्षेचा निकाल कधी लागणार यांची उत्सुकता १० वीच्या विद्यार्थ्यांना लागली आहे. आता त्यांच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे उद्या राज्य माध्यमिक…

कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

Posted by - December 1, 2022 0
पुणे : अ.भा. मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा व आम्ही कोथरुडकर यांच्या वतीने सोमवार दिनांक ५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’चे प्रकाशन

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या…

मविआकडून पुन्हा रवींद्र धंगेकर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - April 7, 2023 0
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *