Raigad Priyanka Sucide

सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; 3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

3160 0

रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रियंका अशोक शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी विकास अशोक शिंदे (Vikas Ashok Shinde) आणि प्रियंका अशोक शिंदे (Priyanka Ashok Shinde) यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. आरोपी पती विकास हा लग्न झाल्यापासून प्रियंकाला नेहमी मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. तसेच तिचा छळ करून तिला नांदवायला नेणार नाही असे वारंवार सांगत होता. अखेर या सर्व जाचाला कंटाळून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

या प्रकरणी आरोपी पती विकास अशोक शिंदे (वय 27 रा. टेमघर तालुका महाड. मूळ रा. मोरगाव जिल्हा पुणे) याच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्यामकांत साधू सिलिमकर (वय 50) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे (Assistant Police Inspector Maruti Andhale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यातील हादरलं ! औंधमध्ये गोळी झाडून तरुणाची हत्या तर आरोपीची आत्महत्या

Posted by - February 10, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) औंध परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात…
Ramdas Kadam

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Posted by - March 15, 2024 0
मुंबई : महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीचा दौरा करणार असून लवकरच महायुतीच्या सर्व जागांचं…

‘हिजाब’ प्रकरणी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई काय म्हणते ?

Posted by - February 9, 2022 0
उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक…

पुणे : वानवडी येथे पञ्याच्या घरांना आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Posted by - November 11, 2022 0
पुणे : काल दिनांक १०•११•२०२२ रोजी राञी ११•३२ वाजता अग्निशमन दलाकडे वानवडी, शिवरकर गार्डनच्या मागे शिवरकर चाळ येथे घराला आग…

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

Posted by - May 29, 2022 0
पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *