Jalgaon

आईला चहाच्या टपरीवर सोडून तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

5009 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने आज सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11 सुमारास उघडकीस आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-19 रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) (Akash Suresh Shere) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगावातील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आपली आई आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत राहत होता. आकाश हा एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे आकाशने आपल्या आईला सकाळी 6 वाजता आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी अंघोळ करण्यासाठी गेला. यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अशाप्रकारे आले उघडकीस
आकाश हा टपरीवर का आला नाही म्हणून आई सविता या त्याला पाहण्यासाठी घरी आल्या. तेव्हा त्यांना आकाशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर आपल्या मुलाला या अवस्थेमध्ये पाहून आईने हंबरडा फोडला. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा (Medical Officer Dr.Namrata Aachhya) यांनी आकाशला तपासून मृत घोषित केले. मृत आकाश याच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस (Midc Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Pune Video

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Posted by - December 29, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Video) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काल वडगाव शेरी येथील घटना ताजी असताना आता…
Pune News

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - May 31, 2024 0
पुणे : सध्या देशभरात चर्चेत असलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणात (Pune Porsche Accident Case) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत…

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आंदोलन

Posted by - May 18, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीमधील घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आज मूक आंदोलन…

हृदयनाथ मंगेशकरांनी मारली थाप आणि मोदींनी सोडला साप..? (संपादकीय)

Posted by - February 11, 2022 0
पहिली थाप (पं. हृदयनाथ मंगेशकर) : ‘… सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला चाल लावली म्हणून आपली आकाशवाणीची नोकरी गेली दुसरी…

जावेद अख्तर देणार ‘पिफ २०२२’ मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

Posted by - February 27, 2022 0
ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *