drowning hands

मातृदिनाच्या दिवशी पुत्रशोक; पुण्यात नेमके काय घडले?

880 0

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आज सगळीकडे मातृदिन (Mother’s Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र पुण्यात एका आईला मातृदिनाच्या दिवशी आपल्या पोटच्या लेकाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
हडपसर (Hadapsar) येथील माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे (Krishna Ganesh Shinde) हा साधना शाळेत (Sadhana School) शिकत होता. तो आपल्या मामासोबत पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. शनिवारी (13 मे) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) शिरला तर त्याचे काकासुद्धा त्याच्या बरोबर पोहू लागले.

यानंतर काही वेळाने कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले कि तो तलावात बुडाला आहे. यानंतर तिकडच्या लोकांनी त्याला तातडीने तलावातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कृष्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

सावधान…’तुका म्हणे’ म्हणू नका ! नववर्षाच्या शुभेच्छा देताना हा शब्द प्रयोग करणं पडू शकतं महागात

Posted by - December 6, 2022 0
सावधान ! नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’, असं चुकूनही म्हणू नका. कारण यापुढं असं चालणार नाही. आता ‘तुका म्हणे’ असा…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर साधला निशाणा

Posted by - August 3, 2023 0
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका…
Sylvester DiCunha Pass Away

Sylvester DiCunha Pass Away : ‘अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे निधन

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : ‘अमूल’ या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा (Sylvester DiCunha Pass Away) यांचे मंगळवारी रात्री…

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Posted by - April 5, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) उपनगरांमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांमध्ये केवळ टँकरने पाणीपुरवठा केला जात…

उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत होता; अजित पवार यांच्याकडून पाठराखण

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *