Gadchiroli News

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

445 0

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल मधुकर सिडाम (12) रा. रामय्यापेठा ता. अहेरी, जिल्हा गडचिरोली असे मृत चिमुकल्याचा नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अमोल मधुकर सिडाम हा 22 ऑक्टोबर रोजी जवळपास सकाळी 11 वाजेपासून घरातून बेपत्ता होता. आई वडील आणि गावकऱ्यांनी शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. काल रात्री तो सुद्धा घरी न आल्याने घरच्यांनी अहेरी पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती पोलिसांना दिली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोलचा शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर गावाच्या परिसरात शोधमोहीम राबवत असताना गावातील तलावात अमोलचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी अमोलचा मृतदेह अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून अमोलच्या आई – वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा घातपात आहे कि अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

Traffic News

Traffic News : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; पुण्यात लांबच लांब रांगा

Posted by - July 19, 2023 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी (Traffic News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबपर्यंत…
Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023 0
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या…

तो कामाच्या निमित्ताने केबिनमध्ये बोलवायचं अन्…;पुण्यातील महिला मॅनेजरची कंपनी मालकाविरोधात पोलिसात धाव

Posted by - July 4, 2024 0
कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजर सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव…

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन

Posted by - May 13, 2022 0
पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. संजीवनी करंदीकर…
Sharad Pawar

Bhiwandi News : भिंवडीत काँग्रेसचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र; राष्ट्रवादीला मोठा झटका

Posted by - June 27, 2023 0
भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध (Bhiwandi News) मतदान करणारे काँग्रेस पक्षाचे 18…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *