Buldhana Accident

Buldhana Accident : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! 10 जण जखमी

681 0

बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे (Buldhana Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. ते काही थांबायचे नाव घेईना. आज सायंकाळी मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर झालेल्या विचित्र वाहन अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात?
एक काळी पिवळी जीप नांदुरा वरून मलकापूर कडे येत होती व ट्रकसुद्धा मलकापूर कडे येत होता. अचानक ट्रकच्या पुढे काही मोकाट गुरे आली. गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक एका बाजूला झुकला. त्याच वेळी काळी पिवळी ट्रकच्या खाली दबली गेली. आजूबाजूच्या नागरिकानी प्रवाशांना बाहेर काढत मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात भरती केले. दहा जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई ते कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जिल्ह्यातून जात असून या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. या अर्धवट रस्त्याचे नुकतेच गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. रस्त्याच्या आजूबाजूला जाळ्या लावल्या नसल्याने रस्त्यावर मोकाट गुरे फिरतात. कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Share This News

Related Post

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर तासभर आधीच मुलांना वाटला ! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

Posted by - March 15, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. अहमदनगर मधील एका महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच विद्यार्थ्यांना मिळाला…

#crime : 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार ! दोघांच्याही कुटुंबीयांची चौकशी, मुलांचं बालपण हरवतंय ? याला जबाबदार नक्की कोण ?

Posted by - February 17, 2023 0
उरण : एक विचित्र घटना उरण मधून समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन…

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 5, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली…
Eknath Shinde dam

शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये काय? एकनाथ शिंदेचा विरोधकांना सवाल

Posted by - May 31, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *