36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

163 0

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडाचे अस्त्र उगारलं असून शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत मध्ये दाखल झाले होते त्यानंतर शिंदे आज गुवाहटी मध्ये दाखल झाले आहेत.

शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह प्रहारचे आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे. याविषयावर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून ते म्हणाले आम्ही विधानपरिषदेला मतदान केलं होतं. मात्र अचानक वातावरण तयार झालं आणि दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेत आलो. सगळे आमदार स्वखुशीने इथे आले आहेत. 36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले कि, सध्या आम्ही गुवाहाटीमध्ये आहे. आज संध्याकाळपर्यंत समजेल. भाजपचे संजय कुटे आमच्यासोबत आहेत. व्यक्तिगत नाराजी नाही. निधी वाटपात विषमता होती. शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष द्यायची गरज होती. मी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून फोन केला होता, असंही कडू यावेळी म्हणाले. यानंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Election

Loksabha Elections : 1951 पासून ते आजपर्यंत तब्बल ‘इतके’ खासदार झाले बिनविरोध

Posted by - April 23, 2024 0
सुरत : सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे खाते उघडले आहे.…
Sambhaji Raje

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण लागू केल्याने छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारचे मानले आभार

Posted by - February 20, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका…

बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 26, 2022 0
पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या…
ED

Big Breaking :पुण्यात ईडीची छापेमारी 

Posted by - April 3, 2023 0
आज सोमवारी सकाळपासून पुण्यातील विविध भागात ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. पुण्यातील कोंढवा, कोरेगाव पार्क, सॅलीसबरी पार्क, नाना पेठ, भांडारकर…

होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *