Crime

पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच ! आंबेगाव पठार परिसरात अज्ञात टोळक्यानं नऊ वाहनं फोडली…

147 0

पुणे: पुण्यात वाहन तोडफोडीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. आंबेगाव पठार येथील स्वामी नगरमधील महारुद्र जिमच्या परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 9 वाहनांची तोडफोड केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास घडलेला हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

गेली काही दिवसांपासून पुणे शहरासह उपनगरांमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. यापूर्वी सहकारनगर, पद्मावती, पर्वती, जनता वसाहत परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री आंबेगाव पठार येथील महारुद्र जिमच्या परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 9 वाहनांची तोडफोड केली. सिमेंट बॉक्सचा वापर करून दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी गणेश दिलीप रांजणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share This News

Related Post

अजितदादा… 17 ठिकाणं… 12 तासांत 31 उद्घाटनं ! (व्हिडिओ )

Posted by - March 12, 2022 0
पुणे- सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल शुक्रवारीच अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला मात्र या सगळ्या धावपळीत या…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…
Vasant More

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्याचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार…
Pune

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मेला पुण्यात होणार संपन्न

Posted by - May 16, 2023 0
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे दि 25 मे ते 28 मे या दिवसात महर्षी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

Posted by - April 13, 2023 0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *