दीपावलीनिमित्त 6 ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

137 0

मुंबई:सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 6 ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या सांगितिक कार्यक्रमंचे नाव “लखलख चंदेरी” असे असून यातील पहिला कार्यक्रम रविवार 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता नागपूरच्या वंजारी नगर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी स्वप्नील बांदोडकर यांच्यासह सन्मिता शिंदे, डॉ. वैशाली उपाध्ये, मुकुल पांडे, आदित्य सावरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

अमरावती येथे रविवारी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी सय्यद, सारंग जोशी आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. तर सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजित परब, मुग्धा कऱ्हाडे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम अमरावती येथील परिणय-बंध हॉल, बडनेरा रोड येथे होणार आहेत.

मुंबई येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. शौनक अभिषेकी, कार्तिकी गायकवाड, प्रसेनजीत कोसंबी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम मुंबई येथील रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहेत.

नाशिक येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. गणेश चंदनशिवे, आकांक्षा कदम, समाधान आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. संजीव चिम्मलगी, केतन पटवर्धन, मधुरा कुंभार आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहेत.

पुणे येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. केतकी माटेगांवकर, श्रीधर फडके, पं. संजीव अभ्यंकर, नारायण खिल्लारी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी, सौरभ काडगावकर आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम पुण्यातील सदाशिव पेठ येथील भरत नाटयमंदिर येथे होणार आहेत.

औरंगाबाद येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, संज्योती जगदाळे आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाटयमंदिर येथे होणार आहेत.

राज्यातील 6 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Murlidhar mohol

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास स्थगिती

Posted by - March 4, 2022 0
पौड फाटा येथील शिलाविहारमधील रहिवाशांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, यासाठी महापौरांसह इतरांनी कटकारस्थान रचून सर्व नागरिकांनी घर सोडून…

आंध्रप्रदेशमधील खासदाराचा सचिव असल्याचे सांगून अमित शहांसोबत फिरणारा ‘तो’ संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

Posted by - September 8, 2022 0
मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. “राजकारणामध्ये धोका सहन करू नका,जे राजकारणात धोका…
Surekha-Punekar

Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत BRS मध्ये केला प्रवेश

Posted by - June 22, 2023 0
पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश (Surekha Punekar Join BRS) केला आहे.…
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित…
Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

Posted by - March 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *