टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

230 0

पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे.
त्यातच आता टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींची यादीच पोलिसांनी जाहीर केली होती.
पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षेत ७ हजार ८०० विद्यार्थी बेकायदेशीरपणे पास झाल्याचे उघड झाले होते. या बोगस शिक्षकांची नावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलीचीही नावांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या मुलींची नावे आहेत. या दोन्हीही मुली सत्तारांच्या औरंगाबाद जिल्हातील शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत.
सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. तर, पुणे शहर पोलीस दलाच्या सायबर पोलिसांकडून तपास सुरु असून ईडीकडून देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 16 हजार 592 परीक्षार्थीं पात्र झाले होते. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी निकाल पडताळून पाहिल्यावर 7 हजार 800 परीक्षार्थी अपात्र होते. पण शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले. याप्रकरणी अनेक उच्च पदस्थांना अटक करण्यात आली होती. तर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही कारवाईचा बडगा
उगारला आहे.

Share This News

Related Post

District Legal Services Authority : 3 दिवसीय आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन

Posted by - July 25, 2022 0
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रमुख जिल्हा व सत्र…

‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन; समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - November 15, 2022 0
पुणे : समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे…

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे E-KYC मोहिमस्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Posted by - July 27, 2022 0
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश…

पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे निधन

Posted by - January 30, 2022 0
पुण्याच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं त्या 69 वर्षाच्या होत्या. मागील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *