TOP NEWS MARATHI SPECIAL: तात्या, एकदाचं जा तरी नाहीतर मनसेत मनापासून राहा तरी…

195 0

वसंत मोरे… आक्रमक, सडेतोड, रोखठोक नेते म्हणजे वसंत मोरे… पुणे महापालिकेवर सलग तीनदा निवडून गेलेले नगरसेवक म्हणजे वसंत मोरे… पुण्यातील मनसेचा एक प्रमुख चेहरा म्हणजे वसंत मोरे… पण यावर्षीचा गुढी पाडवा काय झाला या नेत्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरला. मशिदीबाहेर भोंगे लावण्याच्या राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद न देता वसंत मोरेंनी पक्षाच्या आदेशासमोर आपला नाराजीचा भोंगा वाजवला. परिणामी, शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आणि सुरू झालं वसंत मोरेंचं नाराजीनाट्य… मला अजितदादा बोलावतायत, चंद्रकांतदादा साद घालतायत, असं म्हणता म्हणता मी आजही राजमार्गावर आहे असंही म्हणतायत. त्यामुळं वसंत मोरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ? पाहूयात TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट… ‘तात्या, एकदाचं जा तरी नाहीतर राहा तरी…’

पक्षाच्या भोंग्याविरोधी भूमिकेसमोर वसंत मोरेंनी आपला नाराजीचा भोंगा वाजवला आणि तिथून नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला. पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याप्रकरणी वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन दूर करण्यात आल्यानंतर वसंत मोरेंची नाराजी आणखी वाढली. त्यांनी थेट पक्षाच्या शहर कोअर कमिटीकडं बोट दाखवत आपल्या नाराजीचं कारण उघड केलं. मला कोअर कमिटीकडून डावललं जातंय, असं म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला.

याच मुद्यावरून वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगत असताना कोअर कमिटीकडून होणाऱ्या कुरघोड्या त्यांनी थेट पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या कानावर घातल्या आणि राज ठाकरेंनी मनधरणी करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी त्यांची नेमणूक केली. काही दिवस बरं चाललं पण इकडं वसंत मोरेंनी शहर कार्यालयात होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकांना जाणं टाळलं. त्यानंतर पुन्हा एकदा वसंत मोरेंनी कोअर कमिटीवर आरोप केला आणि इथं या नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरू झाला.

नाराजी वाढतच होती त्यात अजितदादांची आणि वसंत मोरेंची एका लग्नात गाठ पडली आणि वसंत मोरेंना अजितदादांनी पक्षात येण्याची खुली ऑफर दिल्याची चर्चा रंगू लागली. चंद्रकांतदादांकडूनही आपल्याला ऑफर आल्याचं वसंत मोरेंनी सांगून टाकलं.

वसंत मोरेंकडून शहर कोअर कमिटीवर वारंवार होत असलेल्या आरोपांनंतर यावर दोन दिवसांत काय तो निर्णय होईल, असं मनसेचे पुण्यातील पदाधिकारी बाबू वागस्कर यांनी सांगितलं.

राजपुत्र अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आता तरी वसंत मोरेंच्या नाराजीनाट्यावर पडदा पडेल, अशी शक्यता होती पण तीही फोल ठरली. कोअर कमिटी आणि वसंत मोरे यांच्यातील वाद काही मिटलाच नाही. वसंत मोरे यांना इतर पक्षातून ऑफर आल्या आहेत की नाहीत यातलं वास्तव तपासायला हवं, असं बाबू वागस्कर म्हणाले.

वसंत मोरेंचं नाराजीनाट्य अवघा महाराष्ट्र पाहात असतानाच
काल शुक्रवारी या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आला आणि हा ट्विस्ट घडवून आणला तो चक्क वसंत मोरेंनीच ! अमित ठाकरेंसोबतच्या कालच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त करत वसंत मोरे घराच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर त्यांनी जुन्या कार्यक्रमातील बॅनर बाहेर काढला आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून ट्विटरवर शेअर केला. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांचा फोटो असलेले ते दोन बॅनर होते. ते बॅनर एकमेकांपासून वेगळे करत असताना आपल्याला घाम फुटल्याचं सांगत आणि बॅनर फाटले पण राज ठाकरे-वसंत मोरे वेगळे होऊ शकत नाहीत, असं म्हणत मी आजही राजमार्गावर आहे, असा इशारा केला.

कधी नाराज आहे तर कधी मी आजही राजमार्गावर आहे असं सांगणाऱ्या वसंत मोरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे ओळखणं त्यांच्या समर्थकांना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनाही कठीण होऊन बसलंय. वसंत मोरेंची ही द्विधा मनस्थिती पाहाता तात्या, एकदाचं जा तरी नाहीतर मनसेत मनापासून राहा तरी, असंच म्हणण्याची वेळ आलीये, बाकी काय ?

Share This News

Related Post

Punit Balan

Punit Balan : समाज सेवा करा देश सेवा आपोआप घडेल; युवा उद्योजक पुनीत बालन यांचे प्रतिपादन

Posted by - September 10, 2023 0
पुणे : समाज सेवेतून देश सेवा घडवता येते.त्यामुळे पहिल्यांदा समाजाची सेवा करा देश सेवा आपोआप घडेल असे प्रतिपादन युवा उद्योजक…
Kapil Patil

Kapil Patil : खाजगी विद्यापीठांसंदर्भातील पारीत विधेयकामुळे गरिबांच्या शिक्षणावर संक्रात; कपिल पाटील यांची टीका

Posted by - January 14, 2024 0
पुणे : महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे या विद्यापीठांच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशीप किंवा…

महाविकास आघाडीमुळे पुणेकरांवर कराचे ओझे ; जगदीश मुळीक यांची टिका

Posted by - August 25, 2022 0
पुणे : राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

मोदींच्या दौऱ्यात राष्ट्रवादी ताकदीनं विरोध करणार – प्रशांत जगताप

Posted by - March 3, 2022 0
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ‘पानिपत’ होणार आहे. याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र…

येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिलं जाईल; कार्यालय तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *