ST Bus

ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर

1204 0

 

ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे.

या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सुर्फ संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली.

या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे.

सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News

Related Post

भाजपा प्रवेशापूर्वी हार्दिक पटेलांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 2, 2022 0
पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात…
Pune Police

Pune News: कौतुकास्पद ! पुणे पोलिसांच्या जवानांकडून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांना अटक

Posted by - July 19, 2023 0
पुणे : एनआयएकडून 5 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन “मोस्ट वॉन्टेड” दहशतवाद्यांना पुण्याच्या कोथरूड भागातून पुणे पोलिसांच्या 2 जवानांनी पकडले आहे.…
Jalgaon News

Jalgaon News : कुटुंबाचा आधार हरपला ! मोठ्या उत्साहाने कामावर आला, पण कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा

Posted by - October 17, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का…

खातेवाटप झालं आता बंगला वाटप! कोणत्या मंत्र्याला कोणता मिळाला बंगला

Posted by - August 23, 2022 0
मुंबई: राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्य नंतर अखेर 30 जूनला शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *