राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

251 0

सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले आहे. बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.

संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू असून त्याने सन 2013-14 पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दीर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे 2019 ते 2020च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली.

 

त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी ऊर्जामंत्री भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील संकेतचे अभिनंदन केले आहे.

Share This News

Related Post

अजितदादांना भाषण नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या

Posted by - June 14, 2022 0
पुणे- देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार गाव / प्रभाग भेट

Posted by - February 5, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी गाव / प्रभाग भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी…

#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

Posted by - February 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की…
Supreme Court

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Posted by - March 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत (Electoral Bonds) दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला…

भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंच्या पत्नी उषा काकडे यांच्या अडचणीत वाढ

Posted by - January 30, 2023 0
पुणे : मेव्हण्याची बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे  माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे व त्यांच्या पत्नी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *