Raghuveer Ghat Kokan

Raghuvir Ghat Kokan : कोकणातील रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद; पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

864 0

रायगड : मागच्या काही दिवसांपासून कोकणातील (Raghuvir Ghat Kokan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं कोकणातील अनेक नद्यांना पूर आला आहे. यादरम्यान काल इर्शाळवाडी दुर्घटना घडली. यामध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच आता कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा रघुवीर घाट (Raghuvir Ghat Kokan) वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने रघुवीर घाटावर गर्दी करत असतात. त्यामुळं पाऊस सुरू असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय खेडच्या तहसीलदारांनी घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

रघुवीर घाट (Raghuvir Ghat Kokan) हा डोंगर भागालगत असल्याने तिथं दरड कोसळणे किंवा भूस्खलन होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच हवामान खात्याने कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं कोकणाला पुण्याशी जोडणाऱ्या मार्गावर कोणताही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट बंद करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

झोपडीधारकांना होणार मोठा फायदा; प्रकल्पांनाही मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लवकरच नवी नियमावली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - December 30, 2022 0
नागपूर : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन नवी नियमावली लवकरच लागू…

विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !

Posted by - February 14, 2023 0
लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांना एक विशेष मोहीम आखली…

मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

Posted by - April 7, 2023 0
मुंबईतील मढ परिसरात हजारो कोटी खर्च करून उभे करण्यात आलेले फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे…

पुणेकरांनो..! ‘या’ भागांमध्ये गुरुवारी होणार नाही पाणीपुरवठा

Posted by - November 21, 2022 0
पुणे : येत्या गुरुवारी पुण्यातील शहरी भागातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठा,कात्रज परिसर, नगर रस्ता, हडपसर तसेच औंध भागासह कोथरूड परिसरातील…

विषयांची मर्यादा ओळखून आणि वेळेचे भान ठेवून होणारा संवाद हा अतिशय प्रभावी असतो – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 16, 2022 0
पुणे: संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *