ब्रेकिंग न्यूज ! शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त

503 0

मुंबई- एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोच हा शिवसेनेसाठी दुसरा धक्का बसला आहे.

ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याचे समजते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. मात्र, मध्यंतरी हा तपास थंडावला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.

Share This News

Related Post

अखेर…. सस्पेन्स संपला; एमआयएमची दोन मतं महाविकास आघाडी बरोबर

Posted by - June 10, 2022 0
राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदानाला आता सुरुवात झाली असून ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. इम्तियाज…

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…

रक्तरंजित फोटो, मृतदेह, त्रासदायक व्हिडिओ टीव्ही चॅनल्सने दाखवू नये; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रसार माध्यमांना सत्ता ताकीद

Posted by - January 9, 2023 0
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारमाध्यमांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये मृतदेहाचे फोटो रक्ताने माखलेले फोटो किंवा कोणतेही…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

Posted by - April 27, 2024 0
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पुन्हा दुखापत झाली आहे. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना ममता बॅनर्जींना…

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळणार उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी;भाजपचा नवा डाव

Posted by - July 9, 2022 0
दिल्ली:महाराष्ट्रात भाजपने पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरुद्ध बंड पुकारून ठाकरे सरकार पाडलं. एकीकडे महाराष्ट्रात राजकारणामध्ये मोठे बदल होत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *