कुंभमेळ्यात शाकाहारी, मद्यपान न करणारेच पोलीस करणार तैनात; पोलिसांसाठी विशेष नियम व अटी

15 0

2025 च्या जानेवारी महिन्यामध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी जगभरातून भाविक, संत महंत, यात्रेकरू प्रयागराज मध्ये येणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. यावेळी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांसाठीही विशेष अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत.

डीजीपी मुख्यालयातून प्रयागराजला पाठवल्या जाणाऱ्या पोलीस तुकड्यांसंदर्भात विषेश काळजी घेतली जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महाकुंभ मेळ्यात मद्यपान आणि मांसाहार सेवन करणाऱ्या पोलिसांना तैनात केलं जाणार नाही. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा, त्यांचा स्वभाव, दैनंदिन जीवनातील वर्तणूक आणि सत्यनिष्ठा असावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे. याशिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या पोलिसांनाच तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मूळचे प्रयागराजचे असलेले पोलीस कर्मचारी हे या पोलीस बंदोबस्तामध्ये समाविष्ट नसतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस बंदोबस्ताबरोबरच येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची योग्य सोय व्हावी यासाठी देखील प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ज्या घरांमध्ये रिकाम्या खोल्या आहेत त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर भाविकांना राहण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Related Post

थांग-ता, गतका क्रीडा प्रकारातही महाराष्ट्र अव्वल;शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे जोरदार सराव शिबिर सुरू

Posted by - May 23, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया गेम्ससाठी महाराष्ट्राच्या गतका आणि थांग ता या क्रीडा प्रकारातील संघाचा सराव सुरू आहे. येथील…

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

Posted by - March 18, 2022 0
ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार दणका मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असणाऱ्या…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं रचला इतिहास

Posted by - July 24, 2022 0
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि भालाफेकमध्ये 88.13 मीटर फेकून रौप्य पदक जिंकणारा पहिला…
Attempted Self-Immolation

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - December 22, 2023 0
पुणे : विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक (Attempted Self-Immolation) बातमी समोर आली आहे. यामध्ये मॉर्डन महाविद्यालयातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *