MRF Share

MRF च्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे; कंपनीने रचला विक्रम

289 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MRF Limited या टायर आणि रबर उत्पादन निर्मिती कंपनीच्या शेअरच्या किमती आज म्हणजेच 13 जून रोजी 1 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. यासह, MRF च्या शेअरची किंमत प्रति शेअर 1 लाख रुपये झाली आहे. MRF ही पहिली भारतीय कंपनी ठरली जिच्या शेअरच्या किंमतीने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या एका वर्षात, MRF शेअर्स (MRF शेअर किंमत) 46 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत आणि मंगळवारी ते आयुष्यभरातील उच्च पातळीवर पोहोचले आहेत. तत्पूर्वी, तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकालांनंतर या शेअरने 8 मे रोजी 99,933 रुपये प्रति शेअर हा उच्चांक गाठला होता.

जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदाच MRF स्टॉक 90,000 च्या वर बंद झाला आणि जवळपास अडीच वर्षांच्या अंतरानंतर त्याने आज विक्रमी रु. 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, MRF ने लाभांश देत असतानाही कधीही बोनस शेअर्स जारी केले नाहीत किंवा शेअरहोल्डिंग बेस वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिटदेखील केले नाहीत.

Share This News

Related Post

Pune News : अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Posted by - May 21, 2024 0
पुणे : नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. त्यांचा कोणताही…

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022 0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता…
devendra-fadnavis

राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करतंय – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Posted by - April 25, 2022 0
राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…

दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

Posted by - March 25, 2022 0
डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा…
MHT CET Result

MHT CET परीक्षेचा निकाल 12 जून रोजी; सकाळी 11 वाजता होणार जाहीर

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET Result 2023) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *