गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

302 0

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला.या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तर अनेकजण जखमी झाल्याचं स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे ७० हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढलं आहे.

संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्राथमिक तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. यानंतर रविवारी सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

 

Share This News

Related Post

मोदी सरकारकडून केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज

Posted by - March 7, 2022 0
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं…
Ullas Bapat

… उद्धव ठाकरेचं पुन्हा मुख्यमंत्री होतील; घटनातज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Posted by - May 10, 2023 0
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या (दि.11 मे) रोजी निकाल जाहीर होणार असून या निकलापूर्वीच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठं विधान…

मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौर्‍यावर रवाना

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी आज रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

टास्क फोर्सच्या बैठकीत मास्क बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 2, 2022 0
राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *