manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

2915 0

मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे आज सकाळी नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले जरांगे ?
सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

गुन्हे मागे घेतले जाणार
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला .
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.

Share This News

Related Post

Pimpari BRT : निगडी-दापोडी बीआरटी थांब्याची दयनीय अवस्था

Posted by - September 9, 2023 0
पिंपरी : (संध्या नांगरे) – लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या ‘पीएमपी’च्या बसेससाठीच्या निगडी ते दापोडी बीआरटी (Pimpari BRT) मार्गावरील थांब्यांची…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…

”विक्रांत’ युद्धनौकेचा 58 कोटी रुपयांचा निधी किरीट सोमय्या यांनी लाटला’ संजय राऊत यांचा आरोप

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. आयएनएस विक्रांत जहाज…
Ahmednagar News

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Posted by - May 14, 2024 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *