LPG Gas

गॅस सिलिंडरच्या दरात बदल! ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर

701 0

मुंबई : सगळीकडे महागाई (Inflation) वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट (Budget) ढासळत आहे. त्यातच आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात बदल होत असतात. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 83 रूपये 50 पैशांची कपात झाली असून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1 हजार 773 रुपयांवर पोहोचली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1 हजार 103 रुपये आहे तेवढाच आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. कोलकात्यात 1129 रुपये, मुंबईत 1102.5 रुपये, चेन्नईमध्ये 1118.5 रुपये, भोपाळमध्ये 1108.5 रुपये, जयपूरमध्ये 1106.5 रुपये, इंदूरमध्ये 1131 रुपये, अहमदाबादमध्ये 1110 रुपये आणि लखनऊमध्ये 1140.5 रुपये आहे.

Share This News

Related Post

BJP State President Chandrakantada Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा…!

Posted by - July 23, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम…

गोदामात लपवून ठेवलेला रक्तचंदनाचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त, अहमदनगर पोलिसांची कारवाई

Posted by - June 4, 2022 0
अहमदनगर – नगर एमआयडीसीमधील एका गोदामातून लपवून ठेवलेला साडेसात टन रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत सुमारे…

उदय सामंत हल्लाप्रकरणी सहा शिवसैनिकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - August 7, 2022 0
पुणे: शिंदे गटातील आमदार आमदार आणि माजी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुण्यातील…
Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023 0
मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *