मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या ‘दारी’ चा समारोप

149 0

पंढरपूर: आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंग आणि भारूडामधून दिलेला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात, तर ‘नगरेची रचावी जलाशय निर्मावी महा वने लावावी नानाविध’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरण बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सेवाभावी सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे राज्यातील जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लता शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’ गजर करत कलावंतासोबत पाऊली खेळली.

Share This News

Related Post

Uddhav And Eknath

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?

Posted by - February 20, 2024 0
मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही सभागृहात…
Talathi exam 2023

Talathi exam 2023 : तलाठी परीक्षेत सावळा गोंधळ; पेपर उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप

Posted by - August 21, 2023 0
नागपूर : तलाठी भरती परीक्षेत (Talathi exam 2023) सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात (Talathi exam 2023) नुकसान…
Sharad Pawar Shirur

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Posted by - April 2, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. राष्ट्रवादी…

‘हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा’ ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे…

मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

Posted by - January 27, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *