टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

295 0

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे.

पालघर येथील चारोटी जवळ सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीचा भीषण अपघात झाला.

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालक म्हणून दाखल झाले.

 

सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय 

  • सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी प्रमुख होते.
  • टाटा समूहाच्या 144 वर्षांच्या इतिहासात हे पद सांभाळणारे ते सहावे व्यक्ती बनले होते. तसंच टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी मिस्त्री यांच्या रुपात मिळाली होती.
  • सायरस मिस्त्री यांच्या नावाची रतन टाटा यांनी घोषणा केली त्यावेळी सायरस यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारण टाटा समूहाच्या बाहेर त्यांना सार्वजनिक जीवनात फारसं ओळखलं जात नव्हतं.
  • अखेर रतन टाटा यांच्यासोबतच्या वादानंतर त्यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावरून दूरही करण्यात आलं होतं.
  • सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा

Posted by - September 25, 2022 0
पुणे: राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…

Earthquake In Hingoli : हिंगोली जिल्ह्यात भूकंप; 3.6 रिश्टर स्केलची नोंद

Posted by - January 8, 2023 0
हिंगोली : काही दिवसांपासून देशांमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पहाटे साडेचारच्या सुमारास महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये…
Breaking News

मोठी बातमी : हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली

Posted by - December 20, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातून मोठी बातमी समोर येते आहे. हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे. ईव्हीएम वर…

महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर संधीचं सोनं करून दाखवेन – रुपाली पाटील ठोंबरे

Posted by - March 24, 2022 0
रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. गेल्या…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे जे रुग्णालयात केले दाखल ; कारागृहात चक्कर येऊन कोसळले

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज सकाळी त्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *