माजी कायदामंत्री शांती भूषण यांचं निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

941 0

नवी दिल्ली: माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि वकील शांती भूषण यांचे मंगळवारी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. भूषण यांनी आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये 1977 ते 1979 या काळात कायदा मंत्री म्हणून काम केले.

मंगळवारी त्यांनी दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी कायदा मंत्री शांती भूषण हे वकील प्रशांत भूषण यांचे वडील होते.

शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावा लागले. तत्पूर्वी, इंदिरा गांधी 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यावेळेची जनसंघाचे त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात निवडणुकीत गैरव्यवहार करून आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.

Share This News

Related Post

Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांना मुंबई न्यायालयाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Posted by - April 11, 2023 0
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून…

मोक्का @100 ! पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक

Posted by - October 7, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. दरम्यान सायबर चोरट्यांच्या विरुद्ध करण्यात…

संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या संविधान दौडला मिळाला प्रचंड प्रतिसाद; 50 देशांचे 5 हजारहून अधिकजन धावले

Posted by - November 26, 2022 0
पुणे : भारताच्या संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण…

‘मला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकले…’ नवनीत राणा यांना अश्रू अनावर

Posted by - April 6, 2023 0
हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा रडू आवरले नाही. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात…

भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी केलं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Posted by - March 15, 2022 0
भाजप खासदार हेमा मालिनी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माध्यमांशी बोलताना भाजप खासदार म्हणाले की, इतर संस्था…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *