माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सुरक्षेत कपात?

326 0

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

Share This News

Related Post

50 खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, 50 कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी : आम आदमी पार्टी

Posted by - October 31, 2022 0
आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू…
Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही…

विधान परिषद निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप ! एकनाथ शिंदे यांचे बंड ?

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. एकनाथ शिंदे…

अपघाती रविवार! आधी विनायक मेटे आणि आता पाटोद्यातील अपघातात सहा जणांचा मृत्यू

Posted by - August 14, 2022 0
बीड: आजचा रविवार अपघाती रविवार ठरला असून आज पहाटे शिवसंग्राम चे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती निधन झाल्यानंतर…

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Posted by - April 22, 2022 0
नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *