ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

198 0

तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारचे असून येथील रद्दीच्या गोदामात काम करायचे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत असून सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेच्या वेळी मजूर गोदामात झोपले होते. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भीषण आग लागल्यामुळे एक भिंत कोसळली, त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या एक जणाला बचावण्यात आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गांधी नगरचे एसएचओ मोहन राव यांनी सांगितले की, गोदामात 12 लोक उपस्थित होते. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जिवंत बचावला आहे. बचावकार्य वेगात सुरु आहे. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

हैदराबादचे डीसीपी सेंट्रल झोन यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल. मृत्युमुखी पडलेले सर्व बिहारचे रहिवासी आहेत.

Share This News

Related Post

Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा ब्लॉक; वाहतूक पूर्णत: राहणार बंद

Posted by - November 20, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे…

राज ठाकरे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये ; ” अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा ” कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना

Posted by - August 22, 2022 0
मुंबई : ” लोक सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत . त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे . लोक आपला विचार करत…

#CRIME NEWS : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या की आत्महत्या ? त्याच कुटुंबातील तीन लहान मुले अद्याप बेपत्ता

Posted by - January 24, 2023 0
शिरूर : शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असलेल्या भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह…

#MADHAV BHANDARI : राज्यातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Posted by - March 14, 2023 0
‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद…

गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती घराण्यावरील टीका भोवली

Posted by - April 15, 2022 0
सातारा- साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *