ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्त्या ; दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन

402 0

देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

गोव्यात देखील भाजपानं दमदार वाटचाल केली असताना काँग्रेससाठी मात्र प्रत्येक फेरीनंतर हा पेपर कठीण होत चालला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे गोवा आणि उत्तर प्रदेशात देखील काँग्रेस पिछाडीवर असताना दिल्लीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे.

 

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा निषेध करणारे फलक हाती घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल प्रियंका गांधी सेना असं या फलकांवर लिहिलेलं असून त्याखाली इव्हीएमचा निषेध करणारा संदेश लिहिला आहे.

“ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे”, असं या फलकांवर लिहिलेलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसची पीछेहाट होत असताना दुसरीकडे पक्षानं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

Share This News

Related Post

Bacchu Kadu

Bachchu Kadu : ‘..हा तर मोठा गेम’; बच्चू कडूंनी सांगितला राष्ट्रवादीचा पुढचा प्लॅन

Posted by - August 25, 2023 0
कोल्हापूर : शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. एखादा मोठा गट बाहेर पडला तर…
Utkarsha Rupwate

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Posted by - April 18, 2024 0
शिर्डी : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी लोकसभा (Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या नेत्या…

Breking News ! केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात गाजलेल्या केतकी चितळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना…

#Ajmer Files : अजमेरमधील देशातील सर्वात मोठ्या ब्लॅकमेल घोटाळ्यावर बनणार वेब सीरिज, हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

Posted by - March 27, 2023 0
मुख्यमंत्र्यांची खुर्ची हादरवून टाकणारा १९९२ मधील हृदयद्रावक घोटाळा. याच दिवशी अनेक दिवसांपासून महाविद्यालयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *