DRDO

Breaking : डीआरडीओ चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत ATS कोठडी

422 0

पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना आज एटीएसच्या पथकाकडून पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आली. विशेष न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी विशेष न्यायालयाने प्रदीप कुरुलकरला 15 मे पर्यंत ATS कोठडी सुनावण्यात आली आहे. डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने संचालकावर मोठी कारवाई केली होती. हनीट्रॅपमध्ये अडकून त्यांनी संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. निवृत्तीला सहा महिने राहिले असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले आहेत.

Share This News

Related Post

#कसबापोटनिवडणूक : हेमंत रासने सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Posted by - February 5, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाले असून या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत…

पुणे : प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - October 15, 2022 0
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन…
Suicide News

Suicide News : धाराशिव हादरलं! FB Live करून तरुणाने आपले आयुष्य संपवले; नेमके काय घडले?

Posted by - June 21, 2023 0
धाराशिव : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला…
Anis Sundke

Pune News : हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे : अनिस सुंडके

Posted by - April 30, 2024 0
पुणे : सर्वधर्म समभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाले नाहीत. पण आता देशात (Pune…

Breaking ! पुण्यात उद्योगपती अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयचा छापा

Posted by - April 30, 2022 0
पुणे- यस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयची पुणे – मुंबई परिसरात छापेमारी सुरु असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *