डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

542 0

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

 

येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्यास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन वन वाचविण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यंत करीत आहेत. पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळणे गरजेचे आहे. पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्यादृष्टीने परिसरात पोलीसाची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अभयारण्य परिसरात पुणे महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवावी. नागरिकांनी या पक्षी अभयारण्याला भेट द्यावी आणि पर्यावरणाच्यादृष्टीने पुण्यातील हिरवे आच्छादन टिकवण्यासाठी झाडाची लागवड करावी असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाप्रती जागरुक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या कामांची माहिती दिली.

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? सरकारचं शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटलांची भेट

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा…
Bibtya

Pune News : जुन्नरचे बिबटे गुजरातला हलवणार! वनविभागाने घेतला मोठा निर्णय

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune News) जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढत चालला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात फक्त जनावरेच नाही…

धक्कादायक ! फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने केला इंजिनीयर महिलेवर बलात्कार

Posted by - April 23, 2022 0
पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे…

पंकजा मुंढे आणी धनंजय मुंढे यांचा फोटो एकाच बॅनरवर? परळीतील या निवडणुकीसाठी … !

Posted by - December 9, 2022 0
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो एकाच बॅनरवर आल्यामुळे नवीन चर्चेला विषय मिळाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *