संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळा

557 0

टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. यामुळे संपूर्ण आळंदी गजबजली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दिव्यांची रोषणाई केली असल्यामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगत आहे. तिथे सुरू असलेली भाविकांची लगबग या सौंदर्यात भर टाकत असल्याचे चित्र आहे. हरिनामाचा अखंड गजर होत आहे.

पालखी प्रस्थानाआधी मुख्य मंदिरात मानाच्या 47 दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. आज संध्याकाळी 4 वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होईल. श्री गुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती केली जाईल. त्यानंतर संस्थानतर्फे आरती म्हणण्यात येईल. नारळप्रसाद, विधीवत मानपानाचा कार्यक्रम होणार आहे. माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. वीणा मंडपात श्रींच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मानकऱ्यांना पगड्यांचे वाटप होणार आहे. नंतर महाद्वारातून पालखी प्रस्थान होईल. ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने आजोळघरी मुक्कामासाठी जाणार आहे.

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Posted by - April 25, 2024 0
पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी…

‘तुम्ही हनुमान चालीसा लावा…. ‘; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.…
Talathi exam 2023

Talathi exam 2023 : तलाठी परीक्षेत सावळा गोंधळ; पेपर उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप

Posted by - August 21, 2023 0
नागपूर : तलाठी भरती परीक्षेत (Talathi exam 2023) सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात (Talathi exam 2023) नुकसान…

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Posted by - March 15, 2022 0
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *