महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

348 0

मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी करता येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यंदा गुढीपाडवा उत्साहात साजरा करता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेवर देखील बंदी असणार नाही.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. आता राज्यातील कोरोना हा नियंत्रणात आल्याने राज्य मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे निर्णय ?

– 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटतील.
– मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील.
– गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.
– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोसल डिस्टन्सिंग कायम असेल.
– मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल.
– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही.
– लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.

Share This News

Related Post

दाक्षिणात्य ट्रान्सवुमन मॉडेलने लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या

Posted by - May 18, 2022 0
एर्नाकुलम- केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी २६ वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल शेरीन सेलीन मॅथ्यू हिने आत्महत्या केली. लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन नळजोड देणे बंद होण्याची शक्यता

Posted by - May 6, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे धरणात असलेला पाण्याचा कमी साठा तर दुसरीकडे २३ गावांना पाणीपुरवठा…

पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले पत्र मनसेकडून सादर, शरद पवार माफी मागणार का ?

Posted by - April 14, 2022 0
मुंबई- जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा

Posted by - August 19, 2023 0
गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *