महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचं निधन

403 0

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (47) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Share This News

Related Post

Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली…

शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

Posted by - October 30, 2022 0
पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29)…

#URFI JAVED : व्हॅलेंटाइन डेला उर्फीचा ट्रान्सपरंट रेड बाकीनीमध्ये आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज ; व्हिडीओ व्हायरल

Posted by - February 14, 2023 0
‘बिग बॉस ओटीटी’मधून आपला ठसा उमटवणारी उर्फी जावेद सध्या आपल्या फॅशनने चाहत्यांची मने उडवत आहे. इंडस्ट्रीतील फॅशनिस्टा उर्फी जावेदसाठी असा…

दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांनी घट

Posted by - November 1, 2022 0
दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडर म्हणजे सामान्य माणसाच्या सामान्य गरजांपैकीच एक आहे. अशातच सातत्याने वाढणारे गॅस सिलेंडरचे उच्चांकी भाव पाहता…

सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या……

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *