विषयांची मर्यादा ओळखून आणि वेळेचे भान ठेवून होणारा संवाद हा अतिशय प्रभावी असतो – डॉ. नीलम गोऱ्हे

148 0

पुणे: संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे प्रभावी संवाद असतो, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

स्त्री आधार केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यशाळांच्या मालिकेतील एक कार्यशाळा आज पुण्यात महिला सुरक्षा कार्यशाळा या नावाने घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी. औषधांचे परिणाम आणि वितरण, विपणन याच सोबत औषधे विकत घेताना घ्यायची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.
अपर्णा पाठक यांनी हवामान बदलांचा होत असलेला परिणाम आणि याविषयी समाजाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केलं

पुण्याच्या अन्न व औषध पुरवठा विभागाचे अधिकारी शीतल घाटोळ, अर्चना झिंजूर्णे यांनी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी आणि त्याबाबत काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत स्त्री आधार केंद्राच्या सचिव अपर्णा पाठक, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, शेलार गुरुजी, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, विद्या होडे, शर्मिला येवले, आश्लेषा खंडागळे, ज्योती चांदेरे आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
पुणे शहरातील नागरी समस्या, पावसाळ्यातील समस्या या विषयांवर प्रा. विद्या होडे यांनी तर शर्मिला येवले यांनी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळावी तर आरोग्य सुरक्षेसाठी शहरात आरोग्य विषयक फवारणी करण्यात यावी असा ठराव ज्योती चांदेरे यांनी मांडले. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.

सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. आभार शेलार गुरुजी यांनी मानले.

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम; हरी नरके, भुजबळांचा विरोध

Posted by - November 30, 2022 0
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात…

BIG NEWS : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Posted by - October 4, 2022 0
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

पतंजली योगपिठाशी संबंधित जगभरातून सुरू असलेल्या झूम मीटिंगमध्ये सुरू झाला पॉर्न व्हिडिओ आणि… ! पुण्यातील त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - December 22, 2022 0
हरिद्वार : इंटरनेटने जगाला खूप जवळ आणल आहे. त्यात कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम यावर भर दिला…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू , वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले ?

Posted by - April 5, 2023 0
बारामती तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले आणि त्यामुळे शेतकऱ्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *