महाविकास आघाडीच्या मोर्चामुळं वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

218 0

मुंबई: महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे.

महामोर्चा कसा असेल?

मविआकडून आयोजित केलेला महामोर्चाची सुरुवात रिचर्डसन क्रुडास कंपनी, जे . जे . मार्ग ते आझाद मैदानपर्यंत जाणार आहे. सकाळी ०९.३० वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. यासाठी ३१७ पोलीस अधिकारी, १८७० पोलीस अंमलदार, राखीव पोलीस दराचे २२ तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, अश्रुधूर पथक, वॉटर कॅनन, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके असे मिळून ३० पथके तैनात करण्यात येणार आहेत.

वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा करा वापर

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी-चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल, मुंबई सेंट्रल, डॉ.दादासाहेब भंडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड)-ओपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल मुंबई सेंट्रल, ताडदेव सर्कल नाना चौक एन एस पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचाही वापर करता येईल.
  • भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरता डॉ.बी.ए.रोड खडा पारसी, नागपाडा जंक्शन, दोन टाकी जंक्शन जेजे जंक्शन महम्मद अली रोडचा वापर करता येईल. किंवा नागपाडा जंक्शन, मुंबई सेंट्रल ताडदेव सर्कल नाना चौक एन.एम पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करू शकता.
  • भायखळा जिजामाता उद्यान येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी संत सावता मार्गाने मुस्तफा बाजार-रेड रोड स्पिल रोड-बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पुढे पी.डीमेलो रोडने पुढे सी.एसएमटी कडून इच्छित स्थळी तुम्ही पोहोचू शकाल.
  • परळ आणि लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरता बावला कंपाऊंड टी.बी कदम मार्गाने व्होल्ट्स कंपनी उजवे वळण-तानाजी मालुसरे मार्ग, अल्बर्ट जंक्शन, उजवे वळण-बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करता येईल.
  • मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता-आरए, किडवाई मार्गाने-बॅरिस्टर नाथ पै मार्गाने-पी.डिमेलो रोडचा वापर करावा.
  • नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (Eastern Free way)-पी.डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई आणि पुण्यातून दक्षिण मुंबईत जाण्याकरता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग-पी.डिमेलो रोड याचा वापर करावा.
  • दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरता महापालिका मार्ग-मेट्रो जंक्शन-जगन्नाथ शंकर शेठ रोड-प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल, मरीन ड्राईव्ह मार्गाचा वापर करता येईल.
  • दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसंच नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिककडे जाण्यासाठी पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्गावरून इच्छितस्थळी जाऊ शकता.
  • दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरता महर्षी कर्वे रोड/मरिन ड्राईव्ह-ओपेरा हाऊस-लॅमिग्टन रोड-मुंबई सेंट्रल-सात रस्ता-चिंचपोकळी-डॉ.बीए रोडचा वापर करावा.
  • सीएसएमटी स्थानकाकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरता महापालिका मार्ग-मेट्रो जंक्शन-एल.टी मार्ग चकाला डावे वळ-जे.जे जंक्शन-दोन टाकी-नागपाडा जंक्शन-खडा पारसी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकता.
Share This News

Related Post

Fire

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Posted by - December 13, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Kurla Fire) एक मोठी बातमी समोर आली आहे. एलटीटी स्थानकाच्या (लोकमान्य टर्मिनल स्थानक) बुकिंग आणि वेटींग हॉलमध्ये…
Kustipatu

कुस्तीपटूंचा मोठा निर्णय ! आता ऑलिम्पिकमधलं पदकही गंगेत विसर्जित करणार

Posted by - May 30, 2023 0
नवी दिल्ली : मागच्या एक महिन्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे…
Pune NCP

Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

Posted by - July 7, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर (Pune NCP) कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी…

पुण्यात गोवर रुबेला लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

Posted by - January 15, 2023 0
पुणे महापालिकेच्या वतीने गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. लहान मुलांसाठी असलेल्या गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी…
Ajay Maharaj Baraskar

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Posted by - February 24, 2024 0
देहू : मागच्या काही दिवसांपासून अजय बारस्कर (Ajay Baraskar) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *