चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

365 0

मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे.

गृहमंत्र्यांनी चांदीवाल आयोगाचा 201 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला आहे. अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे. मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दरमहिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप पत्रातून करण्यात आला होता.

या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चांदिवाल आयोगाचा अहवाल अनिल देशमुख यांच्यासाठी सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. यानंतर देशमुखांना क्लिनलिट मिळणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

Share This News

Related Post

पिंपरी- चिंचवड महापालिका देणार तृतीय पंथीयांना पेन्शन, काय आहेत त्याचे निकष ?

Posted by - May 11, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असलेले व ज्यांचे ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून…

खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

Posted by - January 19, 2023 0
पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या…
Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *