Amit Shah

CAA : केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी

587 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केले आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह 2019 पासून सीएए लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 10 फेब्रुवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठी घोषणा केली होती.

काही आठवड्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी या कायद्याचे नियम बनवण्यासाठी एक समिती बनवली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयक 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत पारित करण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसात राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सीएएच्या कायद्यामुळे, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी मदत होणार आहे.

काय आहे सीएए?
सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या सहा अल्पसंख्याकांना (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी) भारतीय नागरिकत्व देईल. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील विस्थापित अल्पसंख्याकांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. सीएएच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने एक पोर्टलही सुरू केलं आहे. शेजारील देशांमधून येणाऱ्या पात्र स्थलांतरितांना या पोर्टलवर फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं

Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा

Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

तीन मोठे प्रकल्प गुजरातला कसे गेले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी -सुप्रिया सुळे

Posted by - October 30, 2022 0
पुणे: महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून…
Banglore

Bangalore : मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 3, 2023 0
बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये (Bangalore) आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल…

एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२२ : “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश कौतुकास पात्र आहे…!” विजयी महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंनी थोपटली पाठ

Posted by - December 20, 2022 0
मुंबई : आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती. या लढाईमध्ये भाजप ,राष्ट्रवादी,…
Yusuf Pathan

Yusuf Pathan : युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; TMC कडून उमेदवारी जाहीर

Posted by - March 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (Yusuf Pathan) घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *