World Cup 2023

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला डच्चू?

1236 0

मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

बीसीसीआय निवड समितीने आशिया कपच्या 18 खेळाडूंमधून वर्ल्ड कपसाठी 15 जणांची निवड केली आहे. या संघातून संजू सॅमसन, तिलक वर्मा, अनुभवी फिरकीपटू आर अश्विन, ओपनर शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. संजू सॅमसन याचा आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियात राखीव विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला होता.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

Share This News

Related Post

WPL 2024 Auction

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

Posted by - December 9, 2023 0
मुंबई : यंदा महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024 Auction) दुसरा सिझन आहे. या हंगामाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. वूमेंस…

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचना आज प्रसिद्ध होणार

Posted by - June 2, 2022 0
जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ३ व परिशिष्ट ३(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा…

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह – रामदास आठवले

Posted by - April 8, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या…

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *