महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेल्या सी.पी. राधाकृष्णन यांचा कसा आहे राजकीय प्रवास?

675 0

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली असून नेमके सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे याचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी रात्री उशिरा विविध राज्यातील राज्यपालांच्या नियुक्ता केल्या आहेत यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची नवी राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते फुलंब्रीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी वर्णी लागली आहे राजस्थान मधील भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमकुमार माथुर यांची सिक्कीमच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची नेमके राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूया…

  • चार मे 1957 रोजी तिरुपुरमध्ये सीपी राधाकृष्णन यांचा जन्म
  • वयाच्या सोळाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
  • तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही पाहिलं काम
  • कोईमतूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार
  • 18 मे 2023 पासून झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी
  • पुदुचेरी राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला

सीपी राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले असून या अगोदर भगतसिंग कोशारी आणि रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं…

Share This News

Related Post

24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी कधी पाहिली आहे का ? किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

Posted by - May 2, 2023 0
आतपर्यंत मँगो, पिस्ता, चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फी आपण ऐकल्या असतील पण सोन्याची कुल्फी आणि त्यातही 24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी असं…

कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ? नावे सांगा ; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान

Posted by - June 28, 2022 0
गुवाहाटी- येथील हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले. आमचे…
nashik loksabha

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Posted by - April 28, 2024 0
नाशिक : लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या लोकसभेत राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते,…

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; शरद पवारांची ‘या’ तारखेला पुन्हा साक्ष नोंदवणार

Posted by - April 28, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर हजर राहण्यासाठी नव्याने समन्स…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *