व्यवसायिकाकडून 12 लाखांची लाच घेतल्याचा आरोप! सहायक पोलिस आयुक्तासह पोलिस अंमलदारावर गुन्हा दाखल

780 0

सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस अंमलदार विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

पद्माकर घनवट आणि विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार केली असून घनवट आणि शिक्रे यांनी 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एका बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, तक्रारदार चोरगे यांची सातारा शहरात शैक्षणिक संस्था आहे. ते १४ वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात. दरम्यान, संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना तत्कालीन सातारा ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि शिर्के संस्थेत येऊन नाहक त्रास देत होत.

पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन ‘ब्लॅकमेल’ करत होते. पत्नी व संस्थेतील महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवत होते. तसलेच घनवट आणि शिर्के यांनी २५ लाख रुपये खंडणी मागून १२ लाख ३० हजार रुपये घेतल्याचाही आरोप चोरगे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Share This News

Related Post

Pravin Tarde

Pravin Tarde : यंदाचा ‘फकिरा पुरस्कार’ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवीण तरडे यांना प्रदान

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…
BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष…

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

Posted by - September 26, 2022 0
पुणे : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च…

नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला : महापौर मुरलीधर मोहोळ

Posted by - March 9, 2022 0
पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता…

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघामध्ये 45.25% मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील 215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *