ऐतिहासिक निकाल ! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 38 जणांना फाशीची शिक्षा

225 0

अहमदाबाद- अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी 49 पैकी 38 दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 28 जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायामूर्ती अंबालाल पटेल यांनी 6,752 पानी निकालपत्रं तयार केलं. या स्फोट प्रकरणात एकूण 78 आरोपी होते. त्यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे 77 आरोपी उरले होते. या प्रकरणी तब्बल 1163 लोकांची साक्ष नोंदवण्यात आली होती. पोलीस आणि तपास यंत्रणांनी 6 हजार पुरावे कोर्टात सादर केले होते. दोषींना भादंवि कलमाच्या 302 (हत्या करणे) आणि यूएपीएअंतर्गतही त्यांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.

कोर्टाने या बॉम्बस्फोटप्रकरणी 28 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. एकाचवेळी 49 आरोपींना दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना भादंवि कलमाच्या 302 (हत्या करणे) आणि यूएपीएअंतर्गतही त्यांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.

13 वर्षापूर्वी झाले होते बॉम्बस्फोट

26 जुलै 2008 मध्ये अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटाने हे स्फोट झाले. हे स्फोट मणिनगरमध्ये झालै होते. अतिरेक्यांनी टिफीनमध्ये बॉम्ब ठेवून ते सायकलवर ठेवले होते. त्यानंतर या सायकल गर्दीच्या ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा मतदारसंघ होता. त्यानंतर 70 मिनिटात 20 स्फोट झाले. या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीनने 2002 मधील गोध्राकांडाचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवून आणले होते.

Share This News

Related Post

PATNA-MEEING

Election : आगामी निवडणूक विरोधक एकत्र लढवणार; पाटण्यातील बैठकीत झाला मोठा निर्णय

Posted by - June 23, 2023 0
पाटणा : वृत्तसंस्था – भाजपाविरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांची संयुक्त बैठक (Election) आज पाटण्यात पार पडली. या बैठकीस देशभरातील 15…

अहमदनगर – शिर्डीत साई संस्थानकडुन गोपाळकाल उत्सव साजरा ; पहा VIDEO

Posted by - August 19, 2022 0
अहमदनगर ( शिर्डी ) – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने “गोपाळकाला उत्सवा” निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात कीर्तन झाले.…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

सांगलीचे खासदार संजय पाटील भाजपाला सोडचिठ्ठी देणार ?

Posted by - March 27, 2022 0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगली जिह्ल्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तेथील राजकारणातही खळबळ नेहमीप्रमाणे उडाली. खासदार संजय पाटील यांनी येथील  आपली…

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Posted by - April 14, 2022 0
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *