Breaking News ! भारताचा युवा टेनिसपटू विश्वा दीनदयालन याचा अपघाती मृत्यू, तीन खेळाडू जखमी

260 0

शिलॉंग- 83 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत खेळायला जात असताना तामिळनाडूच्या राष्ट्रीय सब-ज्युनियर टेबल टेनिस पटू विश्व दीनदयालन याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या बरोबरच त्याचे तीन सहकारी खेळाडू जखमी झाले. हा अपघात गुवाहाटीहून शिलाँगला टॅक्सीने जात असताना झाला. यामध्ये टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर तर विश्वला रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

तामिळनाडूचे हे टेबल टेनिसपटू गुवाहाटीहून शिलाँगला टॅक्सीने जात होते. वाटेत एका 12 चाकी ट्रेलरने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर विश्वला रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. जखमी खेळाडूंमध्ये तामिळनाडूचा रमेश कुमार, अबिनाश श्रीनिवासन आणि किशोर कुमार यांचा समावेश आहे.

जागतिक राष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये खेळल्यानंतर, 27 एप्रिल रोजी, तो जागतिक टेबल टेनिस युवा स्पर्धक खेळण्यासाठी भारतीय संघासह ऑस्ट्रियाला जाणार होता. विश्वा हा चेन्नईच्या लॉयला कॉलेजमध्ये बीकॉमचा विद्यार्थी होता. जानेवारीमध्ये डेहराडून येथे झालेल्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिसचे विजेतेपदही त्याने पटकावले होते.

भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमी किशोर कुमार यांच्याशीही ते बोलले. हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि हरियाणा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विश्वा दीनदयालन यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Share This News

Related Post

पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप…

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

Posted by - May 28, 2023 0
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री…

चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

Posted by - May 3, 2022 0
पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या…
Krupal Tumane

ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार; खासदार कृपाल तुमाने यांचा गौप्यस्फोट

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत, असा…
Stamp Paper

Stamp Paper : 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द

Posted by - September 27, 2023 0
मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *