Breaking ! सज्जनगडावर जात असताना कार ८०० फूट खोल दरीत कोसळली, चालकाचा मृत्यू

1041 0

साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेरा गाडीचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात तवेरा गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत गेली. हा अपघात गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात चालक अजित शिंगरे राहणार सज्जनगड यांचा मृत्यू झाला. 

अजित शिंगरे साताऱ्याहून सज्जनगडकडे तवेरा गाडीतून जात होते. चढावर असताना एका तीव्र वळणावर अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट ८०० फूट खोल दरीत कोसळली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा आवाज स्थानिक नागरिकांना ऐकू येताच नागरिकांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी गाडी दरीत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आजसकाळी दरीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला आहे. तो मृतदेह अजित नामक व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले.

Share This News

Related Post

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव 2022 : “महिला महोत्सव हा स्त्री शक्तीचा जागर” : सुहासिनी देशपांडे

Posted by - September 28, 2022 0
पुणे : महिला महोत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री शक्तीचा जागर असून असा उप्रक्रम सातत्याने 22 वर्षे आयोजित करणे ही बाब…
Raj Thackeray

भाजपाला मोठा दिलासा; कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार

Posted by - June 7, 2024 0
मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली…

राज्यातील 7 हजार ग्रामपंचायतींचा आज धुरळा; कोणत्या जिल्ह्यात आहे निवडणूक

Posted by - December 18, 2022 0
राज्याताील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीचा…

सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील

Posted by - April 21, 2023 0
पुणे: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *