‘PMRDA’ समाविष्ट गावांमधील रस्ते, सुविधा क्षेत्रांचे पीएमआरडीएकडून हस्तांतरण

182 0

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ४३७ भूखंड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी-पीएमआरडीए) महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे विकास आराखडा आणि प्रादेशिक योजनेतील रस्ते आणि अन्य सार्वजनिक सेवासुविधांसाठी या भूखंडांचा वापर करता येणार असून समाविष्ट गावांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील अंतर्गत रस्ते, विकास आराखड्यासह प्रादेशिक योजनेतील रस्ते आणि सुविधा क्षेत्राचे ४३७ भूखंड पीएमआरडीएकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. शासनाच्या नगर विकास विभागाकडील ४ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली ११ गावे (लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडे सतरा नळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी व उरुळी देवाची) आणि ३० जून २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली २३ गावे (म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी व वाघोली) पीएमआरडीएकडून हस्तांतरित केलेले अंतर्गत रस्त्याचे १०१ भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्राचे प्रत्येकी १६८ भूखंड असे एकूण ४६७ भूखंड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या संचिका यापूर्वीच महानगरपालिकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

वर्ग केलेल्या प्रकरणांचा तपशील :

तपशील एकूण भूखंड क्षेत्र चौरस मीटरमध्ये

अंतर्गत रस्ते १०१ १,१५,९५०.२०

डीपी किंवा आरपी रस्ते क्षेत्र १६८ १,६३,१७२.६९

सुविधा क्षेत्र १६८ २,३७,३४८.३

Share This News

Related Post

पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - August 29, 2022 0
पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून…

पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम…

महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात जनहित याचिका

Posted by - May 14, 2022 0
पुणे- राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना अंतिम प्रभाग रचनेचे काम ११ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला आव्हान…

सर्वज्ञानी संजय राऊत जी, उत्तर द्याल का ? ; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

Posted by - February 27, 2022 0
शिवसेना खासदार  संजयजी राऊत यांनी महापौर  मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर अग्रलेखातून  ‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’.…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 40% मिळकत करातील सवलत कायम राहणार

Posted by - March 17, 2023 0
पुणे: पुणेकरांना मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *