शंभर पेक्षा जास्त जागा जिंकू, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना विश्वास

110 0

पुणे- भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढविश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील जनतेचा रोष यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या 100 हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर मुळीक पत्रकारांशी बोलत होते.

मुळीक म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह असल्याने आराखडा प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. आराखडा तयार करताना त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. प्रभागांची तोडफोड करून नवीन रचना करण्यात आली. आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीवर भाजप सहज विजय संपादन करू शकेल असा विश्वास वाटतो”

मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, पीएमपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी, नदी शुध्दीकरण योजनेला गती, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम, सेवा कार्य आणि प्रभाग स्तरावर नगरसेवकांनी केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरू असं मुळीक म्हणाले.

Share This News

Related Post

‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ पटोलेंचे वादग्रस्त विधान

Posted by - January 24, 2022 0
नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष…
BJP

प्रथमच भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या 100 च्या पार

Posted by - April 1, 2022 0
नवी दिल्ली- संसदेत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, तर काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे…

महत्वाची बातमी : खडकवासला धरणातून 13,142 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग;भिडे पूल पाण्याखाली,पहा थेट दृश्य (Video)

Posted by - July 12, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून मंगळवारी संध्याकाळी…

नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना…

औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Posted by - April 19, 2022 0
पुणे- महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी (…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *