पुणे शहरात रस्त्यांवरील खड्डे पडल्यामुळे सात अभियंत्यांना आयुक्तांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस

279 0

पुणे:शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे निकृष्ट कामामुळे पडल्याचे समोर आल्यानंतर आता ठेकेदारासोबत अधिकार्‍यांवरही ठपका ठेवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सात कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत.
शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. दीड ते दोन आठवडे सलग झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याचा परिणाम म्हणून शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला, अनेक लहान सहान अपघात झाले, नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला. यामुळे सर्वच स्तरातून प्रशासनावर टीका झाली.
अनेक नवीन रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिकेने काम केलेल्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला. रस्त्यांवर नक्की कोणत्या कारणांमुळे खड्डे पडले आहेत. हे शोध घेण्यासाठी एका त्रयस्थ संस्थेकडून शहरातील रस्त्यांचा सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल संबंधित संस्थेने महापालिकेला सादर केल्यानंतर ठेकेदाराचे दायित्व असलेल्या रस्त्यांवर फारसे खड्डे नाहीत, मात्र विविध खोदाईची कामे झालेल्या रस्त्यावर व ते रस्ते योग्यरित्या दुरुस्त न केल्याने खड्डे पडल्याचे समोर आले.
चुकीच्या पद्धतीने काम करणार्‍या ठेकेदारांना चुकीची कामे केल्याप्रकरणी दंड करण्यात येणार आहे. खड्ड्यांचे कमी, मध्यम, जास्त असे तीन प्रकार केले आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची असते. त्यामुळे पथ विभागाच्या 7 कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना डॉ. खेमनार यांनी पथ विभागाच्या अधिकार्‍यांना केली आहे.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : पुणे बंगळुरु हायवेवर कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Satara News) एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात (Maharashtra Politics) आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या…

राज्यात ‘या’ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

Posted by - April 19, 2022 0
दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने सोमवारी…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ प्रकरणावर फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा मी पुन्हा येईन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता.…

पुणे : मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

Posted by - September 6, 2022 0
पुणे : दरवर्षी प्रमाणे मी गणेशोत्सवामध्ये एक दिवस अभिषेकाला आणि आरतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या चरणी येत असतो, मागचे २…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *