Whatsapp वर ब्लू टिक बंद कसा करायचा ? मेसेज वाचला तरी समोरच्याला कळणार नाही, अशी सेटिंग - टॉप न्यूज मराठी

Whatsapp वर तुम्ही मेसेज वाचलात की समोरच्याला 2 निळ्या टिक (Blue Tick) दिसतात. पण कधी कधी आपल्याला मेसेज वाचायचा असतो पण उत्तर नंतर द्यायचे असते. अशा वेळी ही ट्रिक कामाला येते.

ब्लू टिक बंद करण्याची पूर्ण प्रोसेस

1. Whatsapp ओपन करा

2. वर उजव्या बाजूला 3 टिंबावर (⋮) क्लिक करा

3. Settings वर जा

4. Privacy वर क्लिक करा

5. खाली स्क्रोल करा, तिथे Read Receipts असा ऑप्शन दिसेल

6. तो बंद (Off) करा. बटण बंद करताच तुमची ब्लू टिक बंद होईल.

हे केल्यावर काय होईल ?

- तुम्ही कोणाचा मेसेज वाचला तरी त्याला फक्त 2 ग्रे टिक दिसतील, निळ्या होणार नाहीत.

- पण एक लक्षात ठेवा - तुम्ही पण दुसऱ्याने तुमचा मेसेज वाचला का हे पाहू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने ब्लू टिक बंद होते.

2 महत्वाच्या गोष्टी ज्या सगळ्यांना माहित नाहीत

1. ग्रुपमध्ये ही ट्रिक चालत नाही - तुम्ही ग्रुपमधला मेसेज वाचला तर ग्रुपमध्ये सगळ्यांना ब्लू टिक दिसणारच. प्रायव्हेट चॅटमध्येच ही सेटिंग काम करते.

2. व्हॉईस मेसेजमध्ये पण ब्लू टिक दिसते - तुम्ही Read Receipts बंद केले तरी कोणी तुम्हाला व्हॉईस नोट पाठवला आणि तुम्ही ऐकला, तर त्याला ब्लू टिक दिसेल.

ब्लू टिक बंद न करता मेसेज कसा वाचायचा ?

जर तुम्हाला सेटिंग बंद करायची नसेल तर दुसरी पद्धत आहे.

- नोटिफिकेशनमधून मेसेज वाचा. Whatsapp ओपन करू नका.

- किंवा फोनला Flight Mode लावून Whatsapp ओपन करून मेसेज वाचा, मग Whatsapp पूर्णपणे बंद करून Flight Mode काढा. याने पण ब्लू टिक जाणार नाही.