नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. यामुळे पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम आता व्हाटस अप्प वर मिळवता येणार आहे. पीएफमध्ये किती रक्कम शिल्लक आहे हे तपासण्यासाठी नोकरदार वर्गाला बऱ्याचदा अडचणी येत असतात. या नवीन फीचर मुळे लोक काही सेकंदात त्यांच्या पीएफ खात्याची माहिती घेऊ शकतील. एका क्लिकवर ईपीएफओ सदस्यांना त्यांचे पीएफ बँलेन्स आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती व्हॉट्सॲपवर मिळेल. केंद्र सरकार ईपीएफओच्या सेवांचे डिजिटलीकरण करत असल्याने डिजिटल सेवा अधिक सरळ आणि झटपट मिळणार आहे. ईपीएफओ हे कामगार आणि रोजगार मंत्रालयातंर्गत काम करते. लवकरच ईपीएफओ सदस्यांसाठी युपीआय आणि एटीएम सुविधा सुरू करणार आहे.
ही सुविधा स्मार्टफोनवरच अवलंबून असणार आहे. व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यासाठी ईपीएफओ एक अधिकृत क्रमांक जाहीर करणार आहे. त्या क्रमांकावर ‘हाय’ पाठवल्यावर ईपीएफओच्या सेवा सदस्यांना मिळतील. व्हॉट्सॲप वर पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत क्रमांकावर ‘हाय’ असा मॅसेज करावा लागेल. त्यानंतर ईपीएफओची सिस्टिम युझर्सचा मोबाईल क्रमांकाची पडताळणी करेल. व्हॉट्सॲपवर युझर्सला पीएफ संदर्भात काय माहिती हवी आहे त्यानुसार पर्याय निवडावा लागेल. पर्यायानुसार पीएफ संदर्भातील माहिती या ठिकाणी देण्यात येईल. या सुविधेच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्सची माहिती मिळवता येईल. तसेच मागील 5 व्यवहारांचा तपशील पाहता येईल. या ठिकाणी क्लेम स्टेटची माहिती मिळेल. तर खात्यात किती पैसा शिल्लक आहे आणि किती रक्कम काढता येईल याचीही माहिती मिळेल. ही सर्व माहिती व्हॉट्सॲपवर सहजरित्या मिळेल. अर्थात सध्या काही जण पीएफ संबंधी माहिती मिळवण्यासाठी मिस्डकॉलचा वापर करतात. अथवा उमंग ॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपवर पीएफ संबंधी माहिती घेण्यासाठी केवळ ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत क्रमांकाचाच वापर करावा लागेल. तसेच या सेवेचा ओटीपी आणि पासवर्ड अशी माहिती कुणालाही शेअर करू नका.
भारतातील अनेक बँका आधीपासूनच व्हॉट्सॲप सेवा देतात. या सेवांमुळे ग्राहकांना थेट मेसेजिंग ॲपद्वारे २४x७ आपली शिल्लक तपासणे, स्टेटमेंट डाउनलोड करणे, आपली कार्डे व्यवस्थापित करणे आणि सेवा विनंत्या सादर करणे शक्य होते. यासाठी सामान्यतः ग्राहकांना त्यांच्या बँकेत नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 'हाय' असा मेसेज पाठवावा लागतो. ईपीएफओच्या प्रस्तावित व्हॉट्सॲप सेवेच्या प्रारंभाने पीएफ सदस्यांना अपडेट्स, सपोर्ट आणि तक्रार निवारणासाठी अधिक सोयीस्कर आणि जलद डिजिटल पर्याय उपलब्ध होऊ शकतो.