Vehicle Number Plate: प्रत्येक वाहनावर नंबर प्लेट का असते? यामागचं कारण जाणून घ्या - टॉप न्यूज मराठी

वाहनांची ओळख पटवणे, मालकाचा तपशील शोधणे आणि कायद्याची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी नंबर प्लेटची संकल्पना उदयास आली. 

वाहतूक नियमभंग केल्याबद्दल होणारा दंड आणि इतर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी वाहनांची नंबर प्लेट बादळण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळेच देशाच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हैद्राबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले की, 4 जून रोजी पोलिसांनी हैद्राबाद शहरात विशेष छापे टाकले जय दरम्यान बनावट नंबर प्लेट असलेली 2,100 पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

'ऑपरेशन कवच' अंतर्गत रात्री 10 ते मध्यरात्रीदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. यामध्ये नंबर प्लेट क्लोनिंग, बनावट नंबर प्लेटचा वापर, फसवणूक तसेच दोन वेगवेगळ्या वाहनांवर एकच नंबर वापरल्याची प्रकरणे उघडकीस आली. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, वाहनाच्या नोंदणीकृत नंबरमध्ये कोणताही बदल करणे किंवा नंबर प्लेटमध्ये छेडछाड करणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाईल. तसेच, नंबर प्लेटशी संबंधित कायद्याचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हेगारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावरूनच आजच्या काळात वाहनांच्या नंबर प्लेटला किती महत्त्व आहे, हे लक्षात येते. मात्र, वाहनांना नंबर प्लेट लावण्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता, हे जाणून घेणेही तितकेच रंजक आहे.

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 41(6) नुसार, परिवहन विभागाकडून (ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट) कोणत्याही वाहनाला दिलेला क्रमांक म्हणजे ‘रजिस्ट्रेशन नंबर’. देशातील प्रत्येक मोटार वाहाणाची अधिकृत ओळख पटवण्यासाठी परिवहन विभागाकडून (RTO) हा क्रमांक दिल जातो. मोटार वाहन कायद्यानुसार, हा नंबर गाडीच्या मागे आणि पुढे अशा ठिकाणी लावणे अनिवार्य आहे जिथून तो अगदी स्पष्ट आणि सहज वाचता येईल. या कायद्याच्या कलम 39 नुसार, परिवहन विभागाने दिलेल्या नोंदणी क्रमांकाशिवाय देशात कोणतेही मोटार वाहन चालवणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे. 

गाडीच्या नंबर प्लेटवर असलेले आकडे आणि अक्षरे ही फक्त एक संख्या नसते, तर त्यातून वाहनाबाबत बरीच माहिती मिळते. उदाहरणार्थ, नंबर प्लेटवरील पहिली दोन अक्षरे हे वाहन कोणत्या राज्यात नोंदणीकृत आहे, हे सांगतात. त्यानंतरचे दोन अंक संबंधित जिल्हा किंवा आरटीओ कार्यालयाचा कोड दर्शवतात. मधील इंग्रजी अक्षरे ही नोंदणी मालिकेचा क्रम दाखवतात, तर शेवटचे चार अंक त्या वाहनाचा खास ओळख क्रमांक असतो.

नंबर प्लेटचा इतिहास पाहिला तर, वाहनांसाठी नंबर प्लेट सक्तीची करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला. 1893 मध्ये पॅरिसमध्ये अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनचालकांना शोधण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला. त्यानंतर जर्मनी, नेदरलँड्स आणि अमेरिकेतही नंबर प्लेटचा वापर सुरू झाला.

भारतात वाहनांसाठी नंबर प्लेटचा नियम 1914 मध्ये ब्रिटिश सरकारच्या 'इंडियन मोटर व्हेईकल ॲक्ट' अंतर्गत लागू करण्यात आला. पुढे 1939 आणि 1988 च्या मोटार वाहन कायद्यांनुसार नंबर प्लेटच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले.

आज खाजगी वाहनांसाठी पांढरी, व्यावसायिक वाहनांसाठी पिवळी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवी नंबर प्लेट वापरली जाते. बनावट नंबर प्लेट आणि वाहन चोरी रोखण्यासाठी सरकारने HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटही सुरू केली आहे. याशिवाय, 2021 मध्ये 'BH' (भारत सिरीज) नंबर प्लेटची सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे वारंवार राज्य बदलणाऱ्या नागरिकांना वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची गरज राहत नाही.

आज आपण ज्या प्रकारच्या नंबर प्लेट पाहतो, त्याचे स्वरूप मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत निश्चित करण्यात आले. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 नुसार प्रत्येक राज्याला दोन अक्षरांचा स्वतंत्र कोड देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी MH, तमिळनाडूसाठी TN आणि उत्तर प्रदेशसाठी UP असा कोड वापरला जातो.

तसेच, वाहनांच्या प्रकारानुसार नंबर प्लेटचे रंगही ठरवण्यात आले आहेत. खाजगी वाहनांसाठी पांढरी, व्यावसायिक वाहनांसाठी पिवळी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवी नंबर प्लेट वापरली जाते.

बनावट नंबर प्लेट आणि वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) सुरू केली. या ॲल्युमिनियम प्लेटवर विशेष होलोग्राम आणि लेझरने कोरलेले नंबर असतात, त्यामुळे त्यात फेरफार करणे कठीण जाते.

याशिवाय, 2021 मध्ये 'BH' (भारत सिरीज) नंबर प्लेटची सुरुवात करण्यात आली. वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. या नंबर प्लेटमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची गरज राहत नाही आणि वाहन विकणेही तुलनेने सोपे होते.

#topnews #topnewsmarathi #rto